कर्जतमध्ये 21 गावे, वाड्यांसाठी आदिवासी आदर्श ग्राम योजना

| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील 14 ग्रामपंचायत मधील 21 गावे, वाड्यांमध्ये हि योजना राबविण्यासाठी उच्च शासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून आणि देखरेखीखाली हि योजना राबविली आहे.

तालुक्यातील बेडीसगाव, ओलमन, झुगरेवाडी, बलीवरे, चाफेवाडी, कुरुंग, देवपाडा, अंभेरपाडा ताडवाडी, शिलार, किकवी, पाथरज सुगवे, पिंगळस, धामणी, कशेळे, वंजारवाडी, पळसदरी, चोची यांचा समावेश आहे. या गावांमध्ये आदर्श ग्राम योजना मध्ये ग्राम विकास आराखडा तयार करताना रस्ते विकास, दुरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, गटारे व मल व्यवस्थापन, तसेच कौशल्य वद्धी कार्यक्रम, समुदाय वन विकास, वनधन कार्यक्रम, जल स्त्रोतांचे संरक्षण यावर काम केले जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडुन प्राप्त झालेल्या ग्राम विकास आराखड्यांना मंजुरी आवश्यक आहे.

या योजना अंमलबजावणीसाठी गाव विकास आराखडा दस्तऐवजीकरण करणे तसेच योजनेंतर्गत मंजुर कामांच्या अंमलबजावणीचा दरमहा आढावा घेतला जाणार आहे. योजना राबविण्यासाठी शासनाचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे सह संचालक, मुख्य उपवन अधिकारी, जिल्हा अधिकारी यांचे प्रतिनिधी, जलसंपदा कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता, अग्रणी बँक प्रतिनिधी, सहकार प्रकल्प अधिकारी, भारत संचार निगम, या सर्व विभागांचे अधिकारी समितीमध्ये असून त्यांच्याकडून आदर्श गावांचा विकास आरखडा तयार केला जाणार आहे.

Exit mobile version