आदिवासी बांधवाची फंड योजना

विश्वास हिच मोठी पुंजी

| पेण | प्रतिनिधि |

आज बँका ग्राहकांची विश्वासर्हता गमावत असतानाच पेणच्या ग्रामीण भागातील पाबळ खोऱ्यात आजही पिढयान्‌‍पिढया चालणारी फंड प्रक्रिया अविरत चालू आहे. फंड म्हणजे काय तर गावऱ्यांनी गावकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेली बँक. या बँकेत विश्वास हीच मोठी पुंजी असते. आज बँकामधून साधे पाच ते दहा हजारांचे कर्ज घ्यायचे झाले तर कागदी घोडे नाचवून त्या ग्राहकाच्या नाकी नऊ येते आणि ग्राहकाची अवस्था होते भीक नको पण कुत्रा आवर. त्यातच त्या बँकेचे अधिकारी म्हणजे बँक स्वतःच्या वाडवडिलांची मालमत्ता असल्याप्रमाणे ग्राहकांशी तोडून वागतात. आज बँकेत पैसे ठेवतानासुध्दा चार वेळा विचार करावा लागतो. परंतु आज ग्रामीण भागात वर्षानुवर्षे फंड प्रक्रिया चालू असून हे विना कागदी घोडयांच्या फक्त विश्वासावर चालू आहे.

बोरीचामाळ या गावाला आदर्श गांव योजनेअंतर्गत सहभागी झालेला गावाला 28 एप्रिल 2015 रोजी राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या गावाला भेट दिली होती. हे गाव आदर्श गाव योजनेअंतर्गत का सहभागी केले होते. जाणून येथील फंड प्रक्रिया समजावून घेतली. या गावामध्ये वेगवेगळे सहा फंड आहेत. फंड फोडण्याची प्रक्रिया मकरसंक्रांतीला सकाळी 900ः वा.सुरू होते. गावांतील तरूण मंडळी एका अंगणात सर्वजण वर्तुळाकार बसून वर्षभराचे हिशोब करतात. जे शिकले होते ते रजिस्टरमध्ये लिहिण्याचे काम करत होते.

संबंधित फंड हा 35 तरूणांचा असून या फंडाची सुरूवात 2005 पासून सुरू होती त्यानंतर तो फंड फोडून नव्याने पुन्हा 2021 ला सुरु केला असून त्यामध्ये महिलांना देखील समाविष्ट करून घेतले आहे. सुरूवातीला सर्व विद्यार्थीदशेतील मुलांनी एकत्र येवून पाच रूपये याप्रमाणे वर्गणी जमविण्यास सुरूवात केली. पाच रुपयांनी सुरू केलेला फंड आज 1000रूपयामध्ये जावून पोहचला आहे.


उमेश दोरे
ग्रामस्थ
कर्ज प्रक्रियाः
या फंडाची कर्ज प्रक्रिया साधी आणि सोप्या पध्दतीची आहे. या फंडाच्या सदस्याला फंडामधून कर्ज उपलब्ध करून दिला जातो. हा कर्ज 1 हजारांपासून ते 1 लाखापर्यंत दिला जातो. हे कर्ज आजारपण, घरबांधणी, शेती लागवड, बि-बियाणे, घर दुरूस्ती तसेच फळभाजी शेती व लग्नासाठी उपलब्ध करून दिले जाते. ज्या सदस्याला कर्ज हवं असेल त्याने फंडातील एक सदस्य जामीन देणे गरजेचे असते. मग दोघांकडून लिहून घेतले जाते आणि लगेचच अर्ध्या तासाने कर्जदाराला कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गेल्या 19 वर्षात या फंडाच्या जोरावर अनेक जणांचे जीव आम्ही वाचवले आहेत. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.
Exit mobile version