| अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून सुशोभित कापडी मास्क निर्मिती व कचरा व्यवस्थापन काळाची गरज या विषयावरती मार्गदर्शन कार्यक्रम 20 जुलै 2022 रोजी जे.एस.एस.रायगड संचालक विजय कोकणे यांच्या माध्यमातून लोधिवली आदिवासीवाडी खालापूर येथील ग्रामस्थ व महिला यांच्यासह आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, डॉ. नितीन गांधी, गीतांजली ओक, व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असतांना जन शिक्षण संस्थान रायगडचे विजय कोकणे, इंदूताई पवार,कल्पना म्हात्रे, संजय सांगळे, मीनाक्षी पवार,अपर्णा मोरे, सिद्दी साळुंखे, सारिका सांगळे, वर्षा रामटेके,सारिका राऊत, हिमांशू भालकर इत्यादी मान्यवर व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी लोधिवली आदिवासीवाडी खालापूर येथील ग्रामस्थ व महिला भगिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे व सर्व उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करून स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. गावचे सुशोभित कापडी मास्क निर्मिती व कचरा व्यवस्थापन काळाची गरज या विषयावरती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छता कार्यक्रम व जनजागृती रॅली घेण्यात आली तसेच लागवडीसाठी बांबूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छतेवर आधारित कापडी मास्क बनवण्याच्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.







