आदिवासी दिनी घोषणांनी दुमदुमली पाली

रॅली,पारंपरिक वेशभूषा, संस्कृती,नृत्यकलेचे सादरीकरण

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली-सुधागडसह तालुक्यात आदीवासी कातकरी ठाकूर समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. या दिवशी आदिवासी बांधवांनी एकत्रित येवून पारंपरिक वेशभूषा, गायन, लोकनृत्य करुन संस्कृतीचे जतन करीत तसेच महापुरुषांचा वैचारिक व लढाऊ वारसा जपत हा दिवस साजरा केला. आदिवासी की जय, एकतीर एक कमान, आदिवासी एकसमान, आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पारंपरिक वेशभूषा, संस्कृती जतन, व नृत्यकलेचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी मार्गदर्शनात आदिवासी ठाकूर कातकरी समाज बांधवांमध्ये वादळ आले आहे. आपली शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक प्रगती साधली जावी यासाठी समाज बांधवांनी शिक्षणाची कास धरा, शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही बाबासाहेबांची शिकवण अंगिकारून सर्वांगीण प्रगती साधा तसेच याकामी प्रशासन स्थरावर सर्वोतोपरी सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, सचिन जवके, गणेश सावंत, सुधाकर मोरे, सुमेध खैरे, जुईली ठोंबरे, कल्याणी दबके , दीप्ती पारधी, गणेश यादव, साधुराम बांगारे, चंद्रकांत वाघमारे, विश्‍वास भोय, कृष्णा वाघमारे, रमेश पवार, दगडू वाघमारे, रवींद्र पवार, हिरु हंबीर, सविता हंबीर, राजू बांगारे, लक्ष्मण पवार, संतोष वाघमारे, बबन वाघमारे, सुनीता बांगारे, चंद्रकांत वारगुडे, यशवंत वारगुडे, विष्णू वाघमारे, राम पवार, धम्मशील सावंत, दामोदर शिद, प्रकाश डुंमना, अंकुश हिलम उपस्थित होते.

Exit mobile version