आदिवासी वाडीला मिळाली स्मशानभूमी

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

ग्रूप ग्रामपंचायत माजगाव हद्दित येत असलेल्या दोन अदिवासी वाडीला अद्याप अत्यसंस्कारासाठी स्मशानभुमी नव्हती. यामुळे खोपोलीहून वाहत आलेल्या पाताळगंगेच्या किनार्‍यावर अत्यसंस्कार होत होते. पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होत होती. मात्र, दिपाली पाटील यांनी स्मशान भुमीचे काम पुर्ण करुन देणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. अखेर निवडणूकीत विजयी झाल्यानंतर या ठिकाणी स्मशानभुमी बांधली. यामुळे सरपंच यांच्यासह सदस्य, ग्रामसेवक यांचे या अदिवासी बांधवांनी आभार मानले आहेत.

ग्रूप ग्रामपंचायत माजगांव नेहमी विकास कामामध्ये चर्चेत असून गेले अनेक पिढ्या अदिवासी बांधवांची अत्य संस्कारासाठी होत असलेली गैरसोय आणी त्यांच्या वेदना या जवळून पाहत एक सुशिक्षित सरपंच म्हणून त्यांनी हा प्रश्‍न मार्गी लावला आहे. विविध समस्यांची जाणीव असून त्या सोडविण्यांचे काम महिला वर्ग करु शकते, यासाठी महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडूण दिल्याचे येथिल ग्रामस्थांनी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना संगितले आहे.

माजगाव वाडी आणी पौध वाडीतील ग्रामस्थांना स्मशानभूमी नव्हती. नदिच्या किनार्‍यावर अत्यसंस्कार केले जात होते. मात्र, या लोकनियुक्त सरपंच दिपाली पाटील यांनी आमची मोठी समस्या मार्गी लावली आहे. यामुळे आम्ही ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो.

– कमलाकर वाघे, माजगांव वाडी

Exit mobile version