रायगडात 46 शाळांवर समायोजनाची कुर्‍हाड

3 शाळेत शून्य, 22 शाळेत 1 शिक्षक कार्यरत
। माणगाव । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील एक ते पाच पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांचे समायोजन करावे असे लेखी आदेश जिल्ह्यातील संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी यांना दिल्याने रायगड जिल्ह्यातील पटसंख्या अभावी शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली असून रायगडातील तब्बल 46 जिल्हा परिषदेच्या शाळा व तेथील विद्यार्थ्यांवर समायोजनाची कुर्‍हाड बसणार आहे.
युडाययस प्लस या प्रणाली मधील माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्राप्त माहितीच्या विश्‍लेषणानुसार जिल्ह्यातील 46 शाळांमधून प्रत्येकी 1 या प्रमाणे 46 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 3 शाळांमध्ये शून्य शिक्षक कार्यरत आहेत. तर 22 शाळांमध्ये 1 शिक्षक तर 21 शाळांमध्ये 2 शिक्षक कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील समायोजन करावे लागणार्‍या सर्वाधिक जास्त शाळा महाड तालुक्यातील 15 शाळांचा समावेश आहे. पोलादपूर 4, माणगाव 6, रोहा 5, म्हसळा 6, श्रीवर्धन 1, तळा 2, सुधागड 1, पेण 2, अलिबाग 4 या शाळांचा व त्या शाळेतील विद्यार्थांचा समावेश आहे. या शाळांची समायोजनाची प्रक्रिया तालुका स्तरावर पूर्ण करावी असे आदेश दिल्यामुळे रायगड जिल्ह्यातील 46 जिल्हा परिषदेच्या शाळांवर समायोजनाची कुर्‍हाड बसणार आहे.

Exit mobile version