पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर

धोकादायक ठिकाणी सूचना फलक, जीवरक्षक, आपदा मित्रांची घेणार मदत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दिवेआगर येथील समुद्रकिनारी पुण्यातील आळंदी मधील आठ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक, जीवरक्षक, प्रशिक्षित आपदा मित्र आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध केले जाणार आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरील बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन या तीन नगरपरिषदांसह नागाव, काशीद, हरिहरेश्वर आणि दिवेआगर येथील ग्रामपंचायतींना या उपकरणांचे वाटप करण्यात आले. काशीद येथे दोन उपकरणे देण्यात आली आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी पर्यटन मित्र नियुक्त करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्याला 240 किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. अलिबाग, नागाव, वरसोली, रेवदंडा, आक्षी, मुरूड, काशीद, श्रीवर्धन व दिवेआगर अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यास जातात. अलिबागसह काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धन व मुरूड या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांकडून पसंती दर्शविली जात आहे. या पर्यटनस्थळी पर्यटकांची अलोट गर्दी होते. जिल्ह्यात वर्षाला दहा लाखहून अधिक पर्यटक फिरण्यासाठी येतात. मागील महिन्यात पुणे येथून फिरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांची दखल घेत समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटीक बोया आणि अत्याधुनिक सुरक्षा साधन तैनात केली जाणार आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरील बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन या तीन नगरपरिषदांसह नागाव, काशीद, हरिहरेश्वर आणि दिवेआगर येथील ग्रामपंचायतींना या उपकरणांचे वाटप करण्यात आले. काशीद येथे दोन उपकरणे देण्यात आली आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आधुनिक बचाव उपकरणांचा वापर, प्रशिक्षित जीवरक्षकांची उपलब्धता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस व होमगार्डची गस्त वाढविली जाणार आहे. धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे स्पष्ट सूचना फलक लावले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी आपदा मित्रांची मदत घेणे. त्यांना पोहण्याचे प्रशिक्षण द्यावे आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 31 समुद्रकिनारे असून, त्यापैकी 28 किनारे सुरू असून, 11 समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणांची ओळख करून तेथे आवश्यक सूचना फलक लावले जाणार आहेत. गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि होमगार्डची गस्त वाढवून पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवली जाणार आहे.

Exit mobile version