खालापूरसह खोपोलीत प्रशासन सज्ज

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात अतिवृष्टी होत आहे. 213 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पातळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडल्याने नदी काठच्या गावात पाणी घुसले आहे. खोपोली शहरातील लौजी, श्रीराम नगरमध्ये पाणी शिरले होते. काजुवाडीत माती ढिगारा निघाल्याने अपातकालीन परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी नगरपालिकेच्या सर्व विभागाची टिम बोलावून शहरात सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्त केले आहे. प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोली, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी तालुक्यासह खोपोली शहराची पाहणी केली.

खोपोली शहर घाटमाथ्याच्या पायथ्याशी असल्याने डोंगरावरील छोट्यामोठ्या धबधब्याचे पाणी पातळगंगा नदीला मिळते.त्यातच रागयग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद खालापूरात झाल्याने खोपोली शहरात पावसाचे प्रमाण जास्त होते. मान्सूनपूर्वीच शहरातील नाले सफाई केल्यामुळे कृष्णा नगरसह आदि ठिखाणी पूराची परिस्थिती निर्माण झाली नसली तरी लौजी, श्रीराम नगर, चिंचवली डिपी याठिकाणी अनेक इमारतीमध्ये पाणी घुसले होते. मुख्याधिकारी दुरे यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोरी फोडून पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन केले. माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे हे सुध्दा प्रशासनाला मदत करण्यासाठी उपस्थित होते.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पाणीच पाणी झाल्याने वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. खालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी भरले होते. रस्ते खचले असून 5 ते 6 तास वीजपुरवठा गायब होता. प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोली, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणली.

खोपोली शहरात मुसळधार पाऊस पडत असला तरी प्रशासन आपल्या सोबत आहे. आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नगरपालिकेच्या आपतकालीन पथकाशी टोल फ्रि नं. 02192-262222 या नंबरवर संपर्क साधवा.

अनुप दुरे, मुख्याधिकारी, प्रशासक, खोपोली नगरपालिका
Exit mobile version