रस्त्याच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पंडित पाटील यांची नाराजी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने रायगडात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पण त्यासाठी रस्त्यांच्या स्वच्छता तसेच देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी आ.पंडित पाटील यांनी केला आहे.


या संदर्भात त्यांनी सांगितले की, रायगडात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्रत्यक्षात अनेक रस्त्यांच्या कडेला वाढलेले साधे गवतही काढण्यात आलेले नाही. यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कमालीची अडचण होत आहे. या स्वच्छतेबाबत संबंधित ग्रामपंचायती नेमक्या काय स्वच्छता करतात याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगडला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पण ही अस्वच्छता पाहून ते इकडे येण्याचे टाळतील. पर्यायाने त्याचा स्थानिक पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. एकीकडे सरकार पर्यटनवाढीच्या घोषणा करतेय आणि दुसरीकडे प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची मुलभूत सुविधा न करता अस्वच्छता पसरवीत आहे. अशी टीकाही पंडित पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version