रवींद्र जडेजा अन् पत्नीचे कौतुकास्पद कार्य


लेकीच्या वाढदिवसाला गरीब मुलींच्या खात्यात जमा केले पैसे
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. तो भारतीय संघासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी सज्ज झाला आहे. चार महिन्यांच्या या दौर्‍यावर खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारताकडून सरावाला सुरूवात करणारा पहिला खेळाडू हा जडेजाच होता आणि त्यानं गोलंदाजीचा सराव केला. याच दरम्यान त्यानं मुलगी निध्यानाचा चौथा वाढदिवसही साजरा केला. लेकीच्या वाढदिवसाला रवींद्र जडेजा व त्याची पत्नी रिवाबा यांनी एक कौतुकास्पद कार्यही केलं. या दोघांनी आर्थिकदृष्ट्य दुर्बल असलेल्या पाच कुटुंबीयांच्या खात्यात रक्कम जमा केली.

जडेजाची पत्नी रिवाबानं पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आणि त्यानंतर या सर्व बचत खात्यांमध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले. गरीब कुटुंबातील मुलींच्या नावाने हे बचत खाते उघडण्यात आले आहेत. रवींद्र जडेजासह रिवाबाही इंग्लंडला गेली आहे. अशात पासबूक वाटपाच्या कार्यक्रमात ही दोघे व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सहभागी झाली होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र व रिवाबा या दोघांनी 10 हजार गरीब मुलींना मदत करण्याचा निर्धार केला आहे आणि त्या दिशेने टाकलेले हे पहिलं पाऊल आहे.

रिवाबा करणार नेत्रदान
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबानं तिच्या वाढदिवसानिमित्तानं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा व रिवाबा यांनी 2016मध्ये लग्न केले. शाही अंदाजात झालेल्या या लग्नाला मोठमोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. रिवाबाचे कुटंबीय काँग्रेस पक्षाशी निडगीत आहेत आणि 2019मध्ये रिवाबाने भाजपात प्रवेश केला.

Exit mobile version