नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ची 5 सप्टेंबर, 2021 रोजी परीक्षा आहे. ही परीक्षा मुलींना देण्याची परवानगी देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन असेल. याआधी मुलींना एनडीएमध्ये मुलींना प्रवेश न देण्याच्या निर्णयाबद्दल लष्करावर कोर्टाने टीका केली. सुप्रीम कोर्टाने विचारले की, असे करण्यामागे काय कारण आहे. यावर लष्कराच्या वकिलाने हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले. त्यावेळी हा लष्कराचा निर्णय लिंगभेदावर आधारित निर्णय असल्याची टिपण्णी कोर्टाने केली.