पुरवठा विभागाच्या अधिकार्यांची धाड, अनेकजण अडकणार
। खोपोली । प्रतिनिधी ।
आत्करगांव ग्रामपंचायत हाद्दीतील पॅसिफीक कंपनीत अनाधिकृत केमिकल्स टाक्या उभारून भेसळयुक्त केमिकल्स तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगश कदम यांना मिळाली. योगेश कदम यांनी तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानूसार अधिकार्यांनी सोमवारी (दि.21) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी उंच टाक्यामध्ये ज्वलनशील केमिकल्स आढळून आले. पुरवठा विभाग निरिक्षक अधिकारी मनोज पवार, तलाठी आणि स्टाफच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कंपनीची जागा एनए नाही, अनाधिकृत उंच टाक्याची संख्या जास्त असून, त्यावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यामुळे भविष्यात स्फोट झाल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता संबंधित अधिकार्यांनी वर्तवली आहे.
अनाधिकृत केमिकल्स साठ्याचे कनेक्शन वडाळा पेट्रोलियमशी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कंपनी मालकाला पाठीशी घालणारे अनेकजण अटकण्याची शक्यता आहे. दोषींमधील एकालाही सोडू नका, असा आदेश मंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. खालापूर तालुक्यातील आत्करगांव ग्रामपंचायत हद्दीत गावाशेजारी पॅसिफीक ऑईल अँड एनर्जी कंपनी आहे. या कंपनीत केमिकल्स तयार केले जाते. त्यासाठी मोठमोठ्या साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी तयार होणार्या भेसळयुक्त केमिकल्सचा संबंध वडाळा पेट्रोलियमशी असल्याची गुप्त माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगश कदम यांना मिळाली. योगेश कदम यांनी तात्काळ दखल घेतली असून, सोमवार दि.21 रोजी सायं. 4.30 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.
सुत्रांच्या माहितीनुसार याठिकाणी सॉलटेन नावाच्या केमिकल्सची भेसळ पेट्रोलमध्ये केली जात असून, या प्रकरणाचा वडाळा पेट्रोलियमशी संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठं कनेक्शन असून या कंपनीला परवानगी देण्यासाठी, पाठीशी घालण्यासाठी कोण आहे, यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आ. योगश कदम यांनी दिले आहेत.