| हमरापूर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील काळेश्री गावच्या ॲड. जास्वंदी शशांक ठाकूर यांनी एल.एल.एम. परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले आहे. नुकताच त्या कायद्याचे क्षेत्रातील उच्च मास्टर ऑफ लॉ ही परीक्षा मुंबई विद्यापीठातून विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. वढाव येथील डॉ. हनुमान म्हात्रे व प्रभावती म्हात्रे यांच्या त्या कन्या व नुकताच भारत सरकारने गौरविलेले शेतीनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रियांक म्हात्रे यांच्या भगिनी आहेत. लहानपणापासून हुशार असणाऱ्या ॲड. जास्वंदी ठाकूर यांनी एल.एल.एम. म्हणजेच मास्टर ऑफ लॉ ही विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होऊन बहुमान पटकावल्याबद्दल त्यांचे वढाव गावासह वाशी पंचक्रोशीत तसेच तालुक्यातून अभिनंदन होत आहे.






