| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बोरपाडा येथील रहिवासी देवा ग्रुप फाऊंडेशन आरोग्य विभागाचे कोकण प्रदेश सचिव ॲड. विश्वनाथ भगत यांना युवा महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सिने अभिनेत्री हर्षिता ठाकुर, संस्थापक डॉ. अविनाश सकुंडे, अनुर्वी फाऊंडेशनचे रवी अग्रवाल आणि आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनचे गणेश विटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार समाजसेवेच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. विश्वनाथ भगत यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पुरस्कार प्रदान करताना उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी समर्पित प्रयत्न करणाऱ्या विश्वनाथ भगत यांचे कार्य हे ‘सेवा हीच खरी प्रतिष्ठा’ या तत्त्वावर आधारित असून, त्यांचा हेतू सामान्य माणसाला आरोग्य, शिक्षण व न्याय मिळवून देणे हाच आहे. ॲड. विश्वनाथ भगत हे विविध समाजसेवांचे अखंड कार्यसुद्धा करीत आहेत.
ॲड. विश्वनाथ भगत पुरस्काराने सन्मानित
