अद्वय हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

| मुंबई | प्रतिनिधी |

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे 7.46 कोटी कर्ज घेतले. त्यांनी कर्जाची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने हिरे यांना बुधवारी (दि.15) भोपाळ येथून अटक केली होती. गुरुवारी (दि.16) सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हिरे यांना अटक केल्यानंतर भोपाळ येथून तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्यांना या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रमजानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे कायदेशीर बाबींची पुर्तता झाल्यानंतर त्यांना ओझर येथे ठेवण्यात आले होत.

कर्ज रक्कमेपैकी एकही हप्ता भरलेला नाही. तारण दिलेल्या सुतगिरणी व जमीन विक्रीतून अवघे एक कोटी 78 लाख रुपये मिळाले आहे. कर्ज रक्कमेपैकी सुमारे सहा कोटी रुपये व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले. यातून त्यांनी काय व्यवहार केले. या पैशांचा कसा दुरुपयोग केला याची चौकशी करावयाची आहे असे सरकारपक्षाच्या वकीलाने न्यायलयात सांगितले. याउलट हिरे यांच्यातर्फे कामकाज पाहणारे वकीलांनी गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्र जप्त केलेली आहेत. पोलिस कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद हिरे यांच्या वकीलांनी केला.

नेमका गुन्हा काय
अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना सन 2013 मध्ये त्यांनी रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेच्या नावाने तीन टप्प्यात 7.46 कोटी रुपये कर्ज घेतले. या सुतगिरणीच्या स्मिता हिरे अध्यक्षा होत्या. कर्ज रक्कमेसाठी तारण देण्यात आलेली जमीन कमी किंमतीची होती.
 कागदपत्रांची शहनिशा न करता हे कर्ज देण्यात आले. कर्ज रक्कमेतील 6 कोटी रुपये व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले. कर्जाची रक्कम मुळात रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी विनियोग झालेली नाही. त्यातच कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी यांच्या तक्रारीवरुन रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Exit mobile version