अफगाणिस्ताननं वर्ल्डकप संघाची केली घोषणा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप सुरू होत आहे. या वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात एक आश्चर्यकारक नाव आल्याने सर्वांना आयपीएल 2023 मधील एका वादाची आठवण झाली. अफगाणिस्तानच्या संघात नवीन उल हकची निवड झाली आहे. त्याने 2021 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. नवीन उल हक हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतो.

गेल्या हंगामात आरसीबीविरूद्धच्या सामन्यावेळी नवीन उल हक हा विराट कोहलीशी भिडला होता. त्यानंतर गंभीरचाही विराट कोहलीशी वाद झाला होता. हे प्रकरण खूप तापले होते.
आता या प्रकरणाचा दुसरा अंक हा 11 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दिवशी एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्यात जर नवीन उल हक खेळला तर विराट कोहलीशी त्याचा नक्की सामना होईल. त्यावेळी नवीन आणि विराट कोहली ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळतात ये महत्वाचे ठरणार आहे.

अफगाणिस्तानचा संघ
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकिपर), रहमत शाह, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, अब्दुल रहमान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, नवीन उल हक
स्टँड बाय खेळाडू : गुलबदीन नैब, शराफुद्दीन अशरफ, फरीद अहमद

Exit mobile version