तब्बल 32 वर्षांनंतर द.अफ्रिका अंतिम फेरीत

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 बळी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकात 56 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ 1 गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण अफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसुन काढला आहे. तसेच तब्बल 32 वर्षांनंतर दक्षिण अफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी केली. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 56 धावांवर ऑलआउट केले. अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला. अजमतुल्ला 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर गुरबाजला खातेही उघडता आले नाही. इब्राहिम झद्रान 2 धावा करून बाद झाला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खराब झाली.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कहर
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने 3 षटकांत 16 धावा देत 3 बळी घेतले. शम्सीने 1.5 षटकात 6 धावा देत 3 बळी घेतले. रबाडाने 3 षटकांत 14 धावा देत 2 बळी घेतले. तर नॉर्खियाने 3 षटकांत 7 धावा देत 2 गडी बाद केले. मार्को जॉन्सनने दक्षिण आफ्रिकेला पहिली बळी घेतले. त्याने अफगाणिस्तानचा सलामीवीर गुरबाजला शून्यावर बाद केले होते.
साखळी फेरीत दक्षिण अफ्रीकाने सर्व सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी नेदर्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर सुपर 8 मध्येही आफ्रिका संघ अजेय राहिला. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर आज उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध 9 बाली घेत एकतर्फी विजय मिळवला.
Exit mobile version