। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
आक्रमक सुरुवातीनंतर भारतीय संघ बॅकफूटवर गेला आहे. कर्णधार रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरही जास्त वेळ विकेटवर राहू शकला नाही आणि चार धावा करून बाद झाला. भारताने 20 षटकांनंतर 3 विकेट गमावून 115 धावा केल्या आहेत.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने जोश हेझलवूडच्या पहिल्याच षटकात दोन चौकार मारले. आणि भारताला चांगली सुरूवात करून दिली. त्यांनतर भारताला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने 7 चेंडूत 4 धावा केल्या. गिल नंतर विराट कोहली मैदानावर आला. विराट कोहलीने सातव्या षटकात मिचेल स्टार्कच्या सलग तीन चेंडूंवर तीन चौकार ठोकले.
आक्रमक सुरुवातीनंतर भारतीय संघ बॅकफूटवर गेला. कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला. 10व्या षटकातील ग्लेन मॅक्सवेलच्या चौथ्या षटकात तो बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानावर आला. पण तोही जास्त वेळ विकेटवर राहू शकला नाही आणि चार धावा करून बाद झाला. आता के एल राहुल मैदानावर खेळात आहे.
भारताच्या डावाची 20 षटके संपली आहेत. भारतीय संघाने तीन विकेटवर 115 धावा केल्या आहेत. विराट कोहली 42 चेंडूत 39 आणि के.एल.राहुल 37 चेंडूत 19 धावा करून नाबाद आहे.