ऑनलाईन तक्रार केल्याने पत्रकाराच्या घरची वीज कापली

कुटूंब दोन दिवस अंधारात, मुरुडच्या महाविरण अभियंत्याचा प्रताप

| कोर्लइ | प्रतिनिधी |

ऑनलाइन तक्रार करतो म्हणून चक्क पत्रकाराला धमकावले दोन दिवस त्याच्याच घरची वीज कापली असल्याचा प्रकार मुरुड तालुक्यात घडला आहे. मुरुडच्या महावितरण ग्रामीण विभागाचे अभियंता सतीश खरात यांचा प्रताप, 48 तास संपूर्ण कुटुंब अंधारात घरातील फ्रिजमधील दूध, भाजीपाला, अन्नाची नासाडी झाली, ऑनलाइन केलेल्या तक्रारीचे निवारण न करता वीज ग्राहक पत्रकार संतोष रांजणकरला अंधारात ठेवले. पत्रकार बरोबर हे वीज कर्मचारी अशा प्रकारे वागतात तर सामान्य विज ग्राहकाचे काय? असा सवाल जनमानसातून उठत आहे.

जर आपल्या परिसरातील वीज गेली, आपल्या गावातील वीज गेली, एखादा फेस गेला, लाईट डीम झाली, स्वतःच्या घरातील वीज गेली तर महावितरणने वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरण अ‍ॅप व 1912 तक्रार नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. आपण विजेच्या संदर्भात उद्भभणार्‍या समस्यांची तक्रार या अ‍ॅपद्वारे किंवा 1912 या नंबर वर करू शकतो. या अ‍ॅपचा वापर गेले कित्येक वर्ष पत्रकार संतोष रांजणकर करीत आलेले आहेत. या अ‍ॅपवर तक्रार केल्यानंतर स्थानिक कर्मचार्‍यांचा कॉल येतो की ऑनलाईन तक्रार करू नका काय असेल ते आम्हाला सांगा असं का? ग्राहकांनी ऑनलाइन का तक्रार करू नये? या संदर्भात महावितरण ने लेखी पत्र द्यावे अशी मागणी होत आहे.

नव्याने बदली होऊन आलेल्या मुरुड ग्रामीण भागाचे अभियंता सतीश खरात यांनी तर मोठा प्रतापच केला. सतत ऑनलाईन तक्रार करत असल्यामुळे चक्क पत्रकाराच्याच घरची वीज कापली होती. पत्रकार घरी नसताना बाहेरगावी गेले असताना ही करामत केली होती. ज्यावेळी घरी आले त्यावेळी घरची वीज नसल्याचे लक्षात आले सर्व ठिकाणी वीज उपलब्ध होतील व आपल्याच घरची वेळ नसल्याने ऑनलाईन तक्रार दाखल केले ऑनलाइन तक्रार दाखल केल्यापासून त्या तक्रारीचे चार तासात निवारण होणे गरजेचे असते परंतु तक्रार दाखल केल्यापासून चक्क 24 तास झाले तरी तक्रारीचे निवारण झाले नाही.

अखेरीस जुन्या अभियंत्यांचे जे नंबर होते ते लागत नव्हते एका मित्राकडून या नवीन अभियंता सतीश खरातचा नंबर मिळवला व त्यांना संपर्क करून विचारले असता ते म्हणाले माहिती आहे माहिती आहे तुला ओळखतो तुझं काय रेकॉर्ड आहे ते माहिती आहे कशाला ऑनलाईन तक्रार करतोस सर्वांची लाईट गेली तरी पण तू तक्रार करतोस सर्वांची लाईट गेली तर तुझं काय जातोय असा धमकाऊ लागला होता.

पेण येथील रायगड जिल्ह्याचे महावितरणचे अभियंता मुलानी यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात त्यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यांनी स्वतः मुरुडचे मुख्य अभियंता सूर्यवंशीय यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली होती. त्यानंतर राजीव नेवासेकर पत्रकार मित्राने खरात यांना फोन करून सांगितले की पत्रकार संतोष रांजणकर यांच्या घरची वीज दोन दिवस झाले का चालू केली नाहीत त्यावेळी त्यांचे उत्तर आले की नाही करतो चालू करतो. त्यावेळी ताबडतोब मला सांगितले सांगितले की पत्रकारांना कशाला सांगतेस त्यावेळी मी स्वतः पत्रकार आहे असे सांगितले. पत्रकाराच्याच घरची ऑनलाईन तक्रार करतो म्हणून वीज कापली जाते आणि केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केला जातो. तर सर्वसामान्य वीज ग्राहकांचे काय? असा गंभीर प्रश्‍न जनमानसातून उमटला आहे.

घडलेल्या प्रकारामुळे पत्रकार संघटनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे व या मुजोर महावितरणच्या अभियंता सतीश खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. यासंदर्भात मुरुड महावितरणचे मुख्य अभियंता सूर्यवंशी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून विचारणा केले असता त्यांनी सांगितले की सामान्य ग्राहकाला ऑनलाईन तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे आताचा ऑनलाईन जमाना असल्याने ग्राहकांनी ऑनलाईनच तक्रार करावी असे आवाहन केले आहे. यासाठी महावितरण चे अ‍ॅप डाऊनलोड करा त्यावरून तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवू शकता व 1912 या नंबर वर डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता अशी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version