। मुरुड । प्रतिनिधी ।
विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे आगरदांडा-दिघी या मार्गावरील सागरी वाहतूक दि. १४ जुलै रोजी दुपारी ३:३० नंतर बंद करण्यात आली. धोक्याच्या इशार्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली असल्याची माहिती बंदर अधिकार्यांकडून देण्यात आली आहे. ही जलवाहतूक सेवा १५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सुरू करण्यात येणार असल्याचे दिघी जलवाहतूक सोसायटीकडून सांगण्यात आले आहे.
आगरदांडा-दिघी जलवाहतूक बंद
