। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळ रोठ ग्रुप यांच्या वतीने आगरी चषक व आगरी महोत्सवास उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, उपाध्यक्ष रोहिदास कोल्हटकर, खेळू वारगे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव रामचंद्र मोरे,देवराम कर्णेकर, खजिनदार सचिन मोरे,विलास डाके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मोरे, दिलिप वारंगे, सल्लागार किशोर मोरे, अमित घाग, जनार्दन मोरे, रोठ खु.सरपंच गीता मोरे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक 77 हजार 777 रूपये व आकर्षक चषक, द्वितीय 44 हजार 444 रूपये व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे 22 हजार 222 रूपये व आकर्षक चषक तसेच मालिकावीर खेळाडूस एलईडी टिव्ही व उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना कुलर बक्षिस देण्यात येणार आहे. या महोत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आगरी चषक व आगरी महोत्सवास प्रारंभ
