कर्जतमध्ये आगरी वॉरियर्स संघ उपविजेता

। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत प्रिमियर लिग स्पर्धेचे यंदाचे हे 5 वे वर्षे होतेे. या प्रिमियर लिगचे आयोजक ऋषिकेश राणे यांनी केले होते. प्रथम पारितोषिक 1 लाख रूपये व भव्य चषक आणि द्वितीय पारितोषिक 50 हजार व भव्य चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांसाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आली होती. ही प्रिमियर लिग 4 जानेवारी ते 9 जानेवारी अशी पाच दिवस कशेळे येथील मैदानावर खेळविण्यात आली. एकूण 20 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या प्रिमियर लिगचा अंतिम सामना आगरी वॉरियर्स खांडस आणि चांधई सुपर किंग्स यांच्यामध्ये झाला आणि त्यात चांधई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले तर आगरी वॉरियर्स खांडस संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. या आगरी वॉरीयर्स संघामध्ये नितीन धुळे, शुभम बेलोसे, केदार भगत, मंगेश खेडेकर, संभाजी पथारे, विपुल ऐनकर, राहूल ऐनकर, कैलास मुणे, संदिप काळण, हरिभाऊ दहिफळे, किशोर भोईर, राहूल शिंगाडे या सर्वांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच दोन्ही संघमालकांनी कर्जत प्रिमीयर लीगमध्ये पॅकरशीप दिल्याबद्दल असोसिएशनचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version