अनियमित पाणीपुरवठ्यामुळे कामोठेवासीय आक्रमक

| पनवेल । वार्ताहर ।
त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. सिडको प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने कामोठे कॉलनी फोरमने आक्रमक भूमिका घेतली असून आठवडाभरात पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून कामोठे परिसरातील लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे; मात्र शहरात कमी दाबाने, तसेच रात्री-बेरात्री गढूळ पाणीपुरवठा सुरू असल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. तसेच भरपावसात टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. अनेकदा मध्यरात्री, अनियमित वेळी पाणी येत असल्याने गृहिणींची धावपळ होत आहे. तसेच गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे. शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांनी सिडकोला अनेकदा अर्ज दिले आहेत; मात्र त्यानंतरही कोणताच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिकांनी सिडकोविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

कमी दाबाने, तसेच अवेळी होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको कार्यालयातील पाणीपुरवठा विभाग कार्यालयात नुकतीच धडक देत निवेदन देण्यात आले. या वेळी रंजना सडोलीकर, अरुण जाधव, डॉ. वसंत राठोड, शुभांगी खरात, गीता कुडाळकर, संजीवनी तोत्रे, मुक्ता घुगे, राहुल बुधे आदी उपस्थित होते.

Exit mobile version