पंचायत समिती कार्यालय परिसरात निदर्शने
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी. तसेच, जशास तशी जुनी पेन्शन लागू करावी, या मागण्यांसह लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व अधिकारी व कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्यावतीने बुधवारी (दि.18) पनवेल पंचायत समिती कार्यालय परिसरात निदर्शने करण्यात आली. यावेळी अधिकारी व कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लिपिक संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करूनही आश्वासनाच्या पलीकडे काहीही लागले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेसाठी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व संघटनेच्या वतीने परिसरात निदर्शने करण्यात आली. 23 फेब्रुवारीपासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.







