धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध
| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी संघटना आणि आदिवासी समाजाने धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाला आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये यास्तव संघर्ष आदिवासी सामाजिक संघटनांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात काम करणाऱ्या संघर्ष आदिवासी सामाजिक संघटनेने धनगर समाजाचा अनुसूचित जमाती गटामध्ये समावेश करू नये यासाठी या संघटनेकडून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहेत. संघर्ष आदिवासी सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून आपल्या मागणीचे निवेदन कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांना सादर केले. त्या निवेदनात संघर्ष आदिवासी संघटनेचे संस्थापक राम बांगारे, अध्यक्ष तुकाराम वाघ, उपाध्यक्ष लक्ष्मण पादीर, खजिनदार उमेश वाघ, सचिव कैलास पोकला, मधुकर मेंगाल, नामदेव यांच्यासह गुरुनाथ कातवारा, हरीचंदे वारे, संतोष मेंगाल, शरद ठोंबरे, गिरीश बांगारा, मनोहर मेंगाल, पंढरीनाथ उघडे, पिंगळे आदी उपस्थित होते.







