खोपोलीत ‘इंडिया’ची प्रचारात ‘आघाडी’

संजोग वाघेरेंना मतदारांचा वाढता पाठिंबा

| खोपोली | प्रतिनिधी |

मावळ लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचारासाठी खोपोलीतील महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. गुरुवारी (दि. 18) भाऊ कुंभार चाळ शास्त्री नगर येथील गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, शास्त्री नगर, क्रांतीनगर, काटरंग विणा नगर परिसरात पहिल्या टप्यात प्रचार करण्यात आला.

शिवसेना पक्षाच्या कार्यालयात अनेक दिवस सातत्याने इंडिया आघाडीतील पदाधिकार्‍यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. गुरूवारी गणपती मंदिरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांच्या हस्ते गणेशाची पूजा केल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, शेकापक्षाचे नेते कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, शेकापक्षाचे नेते कैलास गायकवाड, काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, अल्पसंख्याक नेत्या जैबुनीसा शेख, संपर्कप्रमुख हमीद शेख, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव, शेकापक्षाचे शहर चिटणीस अविनाश तावडे, खजिनदार जयंत पाठक, ज्येष्ठ नेते रवींद्र रोकडे, काँग्रेस शहर सरचिटणीस सागर जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या अनिता पाटील, किशोरी शिगवण, आदिती पवार, कविता पाटील, भाग्यश्री चव्हाण, आसावरी घोसाळकर, माजी नगरसेवक नितीन मोरे, शिवसेना प्रवक्ते विलास चाळके, राष्ट्रवादीच्या जयश्री डोंगरे, प्रज्ञा महाडिक, भाऊ कुंभार चाळीतील महिला ग्रामस्थ तसेच इंडिया आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून, त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ. तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत मशाल ही निशाणी पोहोचलेली आहे. गद्दारांना निकालाच्या दिवशी चपराक बसेल.

एकनाथ पिंगळे,
शिवसेना तालुकाप्रमुख

संविधान वाचवण्याचा काम इंडिया आघाडी करणार आहे. सर्व पक्ष आता पेटून उठले आहेत आणि जोमाने काम करत आहेत. त्यामुळे संजोग वाघेरे हे प्रचंड बहुमताने निवडून येणार यामध्ये शंकाच नाही.

रवी रोकडे,
शेकाप नेते

भाजप सरकारला जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे भाजपविरोधात सर्वसामान्य महिलादेखील घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे नक्कीच संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्‍चित आहे.

सुवर्णा मोरे,
शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी शरद पवार गट
Exit mobile version