खालापुरात आघाडीची बाजी

| खोपोली | प्रतिनिधी |

तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये शिंदे गटाने सरपंचपदाच्या सर्वात जास्त जागी विजयी होण्याचा मान मिळविला. यामध्ये शिवसेना शिंदे गटाला सहा, अजित पवार राष्ट्रवादी गटाला पाच, काँग्रेसला एक, स्थानिक आघाडी एक, शिवसेना उद्धव ठाकरे गट चार, महाविकास आघाडी दोन तर भारतीय जनता पार्टी चार जागा मिळविण्यात यश आले आहे.

खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींचे मतदान रविवार पार पडले होते. सोमवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून, सर्वाधिक सहा जागांवर थेट सरपंचपदी आपले उमेदवार निवडून आणले आहेत. त्यापैकी नारंगी, चिलठन, नंदनपाडा, जांभिवली, मानकिवली व आत्करगाव येथे शेकाप व शिंदे गट मिळून अशा सहा जागा शिंदे गटाने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. तर ठाणेन्हावे, कुंभिवली सावरोली, बीडखुर्द, वासांबे या ग्रामपंचायतींवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. इतर काँग्रेसकडे चांभार्ली ही ग्रामपंचायत संपूर्ण पॅनलसह घेता आली, तर बोरगाव, वरोसे या भाजपकडे राहिल्या असून, इसांबे येथे भाजप व शिवसेना अशी युती होती, तर खानाव येथे स्थानिक आघाडीने सरपंचपद घेतले आहे.

थेट सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार अविनाश आमले मआवि तांबाटी, जागृती मोरे भाजप बोरगाव, भारती आरावकर शिंदे गट नारंगी, मनीषा गायकर शिंदे गट चिलठन, सोनाली भाद्रिके राष्ट्रवादी ठानेन्हावे, रेश्मा वीर राष्ट्रवादी कुंभिवली, संतोष बैलमारे राष्ट्रवादी सावरोली, शिल्पा खांडेकर शिवसेना उबाठा जांबरुंग, बाळू वाघमारे शिंदे गट मानकिवली, प्रिया विचारे उबाठा वावर्ले, महेश पाटील उबाठा शिरवली, गीता वाघमारे स्थानिक आघाडी खानाव, प्रदीप पाटील काँग्रेस चांभार्ली, प्रकाश पाटील मआवि होनाड, शर्मिला भोईर शेकाप- शिंदे गट आत्करगाव, हिरामण हिलम भाजप-उभाठा इसांबे, भाऊ पवार राष्ट्रवादी बीड खुर्द, पार्वती भस्मा भाजप वरोसे, दिपाली पाटील मआवि माजगाव, उमा मुंडे राष्ट्रवादी वासांबे.

Exit mobile version