शालोर्ट लेकमधील गाळासाठी करणार आंदोलन

29 जुलैपासून निसर्ग पर्यटन संस्थेचा उपोषणाचा निर्णय

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्याचे आश्‍वासन माथेरान नगरपरिषदेने दिले होते. मात्र महिन्यानंतर देखील कोणतीही कार्यवाही पालिकेने केली नाही.त्यामुळे माथेरान निसर्ग पर्यटन संस्था 29 जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहे.

माथेरानमधील ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या शार्लोट लेक या तलावाची स्वच्छता 2012 नंतर करण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील गाळ काढण्याची मागणी पुढे करीत माथेरान निसर्ग पर्यटन संस्था पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी या संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम हे 18 जून रोजी उपोषणाला बसले होते.त्यानंतर 19 जून रोजी माथेरान नगरपरिषद करून निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून 20 जुलैपर्यंत शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे आश्‍वासन दिले होते. मात्र माथेरान पालिकेकडून लेखी आश्‍वासन पाळले गेले नाही आणि त्यामुळे माथेरान निसर्ग पर्यटन संस्था यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

22 जुलै रोजी संस्थेचे वतीने पत्र देवून 20 जुलैपर्यंत शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही.तसेच कोणत्याही प्रकारे या कामासाठी कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे एक महिन्याची मुदत संपल्याने अखेर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निसर्ग पर्यटन संस्थेचे पदाधिकारी यांनी माथेरान पालिकेत जावून शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामाची कार्यालयीन माहिती घेतले आणि नंतर उपोषणाची नोटीस दिली. माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम हे उपोषणाला बसणार असून निसर्ग पर्यटन संस्थेचे सर्व सदस्यांचे या उपोषणाला पाठिंबा असणार आहे.शार्लोट लेकमधील गाळ काढण्याची कार्यवाही झाली नसल्याने उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन महसूल अधीक्षक तसेच पोलीस प्रशासन यांना देखील देण्यात आले आहे. लेकमधील गाळ काढण्याच्या मागणीसाठी तीन कोटींची तरतूद केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून करण्यात आली आहे.लेकचे संवर्धन करण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर असून त्यातील तीन कोटींचा निधी पालिकेकडे आलेला आहे.त्या निधीतून तलावातील गाळ काढणे आणि तलावाचे संवर्धन करणे आदी कामे केली जाणार आहेत.

Exit mobile version