छत्रपती शिवरायांची वाघनखे आणण्याचा युकेबरोबर करार

| लंडन | वृत्तसंस्था |
छत्रपती शिवरायांची वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही वाघनखे परत आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंत्री उदय सामंत यांनी लंडनसोबत सामंजस्य करार केला आहे. ही वाघनखे तीन वर्षासाठी भारतात आणण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे जवळून पाहता येणार आहेत.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांविषयी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूरकर्मा अफझल खानाचा वध केला होता. क्रूरकर्मा औरंगजेब हा आलमगीर समजत होता. त्यामुळे त्यानं मराठी जनतेवर अन्याय केला. मात्र जेव्हा अन्याय वाढतो, तेव्हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष ईश्वर क्रूरकर्म्यांचा नाश करण्यासाठी पाठवतो, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version