रिशांक देवाडीका, अनंत वारगे यांची प्रमुख उपस्थिती
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील कोकबन येथील वाजंत्री क्रिडा नगरी येथे शुक्रवारी (दि.29) रोजी राज्यमंत्री मिनक्षी पाटील यांच्या दु:खद निधनामुळे होणारी कब्बडी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ती स्पर्धा शनिवार (दि.30) रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत व्याघेश्वर रोठ खुर्द संघ ठरला आगरी चषकाचा मानकरी. यावेळभ् जिल्ह्यातील नामवंत 32 संघाने सहभाग नोंदविला होता.
स्पर्ध्येत अंतिम लढत वाघेश्वर रोठ खुर्द व टि.बी.एम.कारावी या दोन बलाढ्य संघामध्ये झाली. वाघेश्वर रोठ संघाकडून धीरज खरीवळे यांच्या उत्कृष्ट चढाया व सनी भगत, आशिष मोरे यांनी केलेल्या अप्रतिम पकडीच्या जोरावर अंतिम लढतीमध्ये सहज विजय संपादित केला.
प्रथम क्रमांक वाघेश्वर रोठ संघास रोख रक्कम 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक टि.बि.एम. कारवी संघास 25000 रुपये, तृतीय क्रमांक जय हनुमान वाशी संघास 15000 रुपये व चतुर्थ क्रमांक वादळ खारिक वाडा संघास 15000 रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, पब्लिक हिरो खारिक वाडा संघाचा ओंकार मेस्त्री, उत्कृष्ट पक्कड जय हनुमान वाशी संघाचा विकास जोगडे, उत्कृष्ट चढाई टि.बि.एम. कारावी संघाचा करण पाटिल व मालिकावीर रोठ खुर्द संघाचा ओंकार खेरटकर यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत भेट देण्यासाठी प्रो कबड्डी खेळाडू रिशांक देवाडीका, राष्ट्रीय खेळाडू अनंत वारगे, अमित घाग, अॅड. मनोजकुमार शिंदे, तेजस्वीनी वाजंत्री, उद्देश वाडकर, मनोज भायतांडेल, संजय म्हात्रे व प्रमोद म्हात्रे यांनी या स्पर्धेला भेट दिली .
यावेळी हरिश्चंद्र मोरे, अनिल माळी, सचिव म्हात्रे, अतुल पाटील, हरीचंद्र वाजंत्री, सचिन मोरे, दिलिप म्हात्रे, नंदुकुमार म्हात्रे, रामचंद्र सपकाळ, रामाशेट म्हात्रे, हेमंत ठाकूर, तुषार वाजंत्री, हेमंत कांबळे, विठ्ठल मोरे, ज्ञानेश्वर मुंगळे, भरत मुंगळे, दिनेश कांबळे, जयवंत मुंगळे, प्रविण मोरे, संदेश मोरे, विलास डाके, शंकर दिवकर, वामन पारंगे, सुरेश पाटील, रामचंद्र मोरे, शंकर दिवकर, अमीत कांबळे, विठ्ठल मोरे, नरेश म्हात्रे, दत्ताराम मोरे, सुरेश पाटील, मोरेश्वर कोल्हटकर, अशोक ठाकूर, देवचंद म्हात्रे तसेच सर्व आगरी बाधंव यांनी स्पर्धेला अथंग मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली.