। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषी पर्यटन क्षेत्राला चालना देणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने अलिबाग ॲग्रो टुरिझम स्टेकहोल्डर्स (कृषी पर्यटन व्यावसायिक) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शुक्रवार, दि.१० जुलै रोजी दुपारी ३ वाजता वरसोली (अलिबाग) येथील पर्णकुटी येथे होणार आहे.
या बैठकीमध्ये शासनाच्या कृषी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी व त्याअंतर्गत मिळणारे लाभ, कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे मार्ग, कृषी पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच कृषी पर्यटन क्षेत्रातील विविध आव्हाने व त्यावरील उपाययोजना या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी पर्यटन व्यवसाय अधिक सक्षम आणि व्यावसायिक पद्धतीने विकसित करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, या क्षेत्रातील सर्व कृषी पर्यटन व्यावसायिक, शेतकरी आणि इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये कृषी पर्यटन व्यावसायिक बैठकीचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606