| कोर्लई | प्रतिनिधी |
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक (2.0)अंर्तगत भारतीय बहुउद्देशीय खादी 1 ग्रामोद्योग शिक्षण संस्था, वर्धा या संस्थेतर्फे मुरुड तालुक्यातील उसरोली येथील पंचक्रोशी आगरी समाज हॉलमध्ये शेती-उद्योग विषयक प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये आदाड, खारदोडकुळे, उसरोली, खारिकवाडा आजुबाजूच्या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष यशवंत होले तसेच प्रशिक्षक म्हणून लाभलेले शंकर नागतोडे, अशोक कुंभरे, राहुल चिकाटे, माजी सरपंच महेश पाटील, जयेश नांदगावकर, शिवसेना शाखा प्रमुख (आदाड), नितेश पाटील व निलेश नागरी उमेश ठाकुर, सीआरपी रुकसाना खानजादे (शाखा प्रमुख), नंदीनी नाक्ती, मनिषा पाटील, अश्विनी पाटील, विप्रिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







