| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या भात पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी (दि.29) ऑक्टोबर रोजी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि शासनस्तरावर योग्य कार्यवाहीसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
पाहणी दौऱ्यात मंडळ कृषी अधिकारी पाली व परळी तसेच सर्व उपकृषी अधिकारी तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात राबगाव, तोरणगाव, पावसाळवाडी, गौलमाळ, कुंभारशेत, राबगाव, वाकणगाव, मौजे झाप, मौजे कासरवाडी, नानोसे, नेरे, उसाळे या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भात पीक नुकसानीची नोंद घेण्यात आली. तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे स्वरूप स्पष्ट केले आणि नुकसान भरपाईसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने केली जाईल, असे आश्वासन दिले.
सुधागडात कृषी अधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी
