कृषी आयुक्तांचे शेतकऱ्यांस मार्गदर्शन

| पाताळगंगा | वार्ताहर |

राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी रामेती खोपोली या ठिकाणी भेट देऊन येथील कामाची पद्धत आणि नियोजन कसे असते, यासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पी.एम.एफ.एम.ई) मध्ये लाभ घेतलेल्या करुणा गायकवाड व त्यांचे पती सुनील गायकवाड यांच्या करुणा चपाती सेंटर येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक ठाणे अंकुश माने, जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, रोमचीच्या प्रा. उर्मिला राजपूत, स्मार्ट नोडल ऑफिसर सतीश बोराडे, उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी उरण अर्चना सुळ व तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गोरक्षनाथ मुरकुटे, मंडळ कृषी अधिकारी खालापूर जे.के. देशमुख, कृषी पर्यवेक्षक धुमाळ व महाडिक, कृषी सहाय्यक नितीन रानजुण, अजित फराटे व बीटीएम प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या. भेटीच्या वेळेस एमसीडीसीचे जिल्हा समन्वयक सूरज काशीद, संभाजी पाटील महड, अशोक तट्टू महड व हिराजी पाटील आपटी उपस्थित होते.

Exit mobile version