नागाव येथे कृषी दिन साजरा

किसान गप्पा गोष्टी स्तुत्य उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे व नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांच्या विद्यमाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कृषी दिन व किसान गप्पा गोष्टी उपक्रम दि.1 जुलै रोजी नागाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कृषी दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे या होत्या. तर सरपंच हर्षदा मयेकर, उपविभागीय कृषी अधिकारी वानखेडे, प्रकल्प उपसंचालक भांडवलकर, कृषी विभाग अधिकारी रायगड जि.प. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य निखिल मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, मुख्य वक्ते गुरसाळे, ग्रामविकास अधिकारी श्‍वेता कदम, सदस्या अंकिता शेवडे, लिना भगत, रिना पिंपळे, निकिता पाडेकर, सदस्य परेश ठाकुर, तसेच मोठ्या संख्येने नागाव पंचक्रोशीतील शेतकरी व बागायतदार यांची उपस्थिती होती.

यावेळी गप्पा गोष्टी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना प्रधानमंत्री पिक विमा योजना विशेष माहिती देण्यात आली. तसेच, मुख्य वक्ते गुरसाळे सर यांनी उपस्थितांना सेंद्रीय खते व रासायनिक खते याबाबत मार्गदर्शन केले.

नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकर्‍यांसाठी पुरक वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे व सरकारी सर्व योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी नागाव ग्रामपंचायत सरपंच म्हणून कटीबद्ध राहीन.

हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव
Exit mobile version