खामगाव येथे कृषीदिन उत्साहात

| म्हसळा | वार्ताहर |

महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून महसून विभाग म्हसळा यांच्या विद्यमाने खामगाव येथे कृषी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कृषी मेळाव्यास निवासी नायब तहसीलदार धर्मराज पाटिल, मंडळ अधिकारी सलीम शहा, कृषी पर्यवेक्षक मगर, तलाठी गोरख माने, योगेश डांगळे, कृषी सहाय्यक गणेश देवडे, स्वप्नील मांदळे, सरपंच, ग्रामसेवक, कोतवाल आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना निवासी नायब तहसीलदार धर्मराज पाटील यांनी 100 टक्के ई-पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्वेबाबत जनजागृती होणे अत्यावश्यक असल्याचे सांगून संगणक प्रणाली आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशनबाबत सविस्तर माहिती सांगितली. त्याचप्रमाणे वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. आपल्या मार्गदर्शनात तहसीलदार समीर घारे यांनी शेतकर्‍यांची शेतीविषयक कामे, बी-बियाणे, खते, पशुसंवर्धन संरक्षण, धान्य साठवण, कृषी उत्पादनांची मूल्यवर्धन प्रक्रिया आणि शेतकर्‍यांनी पिकविलेल्या मालाला योग्य दर आणि बाजारपेठ मिळवून देणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Exit mobile version