शाळेतील विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील को.ए.सो. लोकनेते अॅड. दत्ता पाटील हायस्कूलच्यावतीने बुधवारी (दि.18) आषाढी एकादशी निमित्त कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे सभापती प्रकाश खडपे, मुख्याध्यापक बोंद्रे, शिक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली होती. शाळेच्या आवारातून दिंडीला सुरुवात करण्यात आली. ही दिंडी संपूर्ण बेलोशी गावातून फिरत विठ्ठल मंदिराकडे दिंडी मार्गस्थ झाली. त्यावेळी ग्रामस्थांनी दिंडीसह शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विठ्ठल नामाचा जयघोष करीत वृक्ष लागवडीचे महत्व या दिंडीच्या निमित्ताने पटवून देण्यात आले. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विठ्ठल रुक्मीणी, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत निवृत्ती, मुक्ताई तसेच संत तुकाराम यांची वेशभुषा करण्यात आल्या.