| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दि जयंती शुक्रवारी (दि. 31) साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, सदस्य पांडुरंग पाटील, मा. सभापती महादेव पाटील, निवृत्त वन अधिकारी बाळकृष्ण गोरनाक, कृषी पर्यवेक्षक सुजय कुसळकर, विनोद सोनावणे, के.पी. कुरकुरे, सुशीलकुमार गाडगे, धनंजय सरनाईक, नरेश जामकर, परेश नाक्ती, सायली चोगले, प्राची मेंदडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सती साध्वी देवी अहिल्या, लोकमाता, कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर, राजयोगिनी अहिल्याबाई होळकर, पुण्य. अहिल्यादेवी होळकर, भारतीय स्त्रीरत्न, अहिल्याबाई होळकर, महाराणी अहिल्याबाई होळकर अशी विविध पुस्तके ठेवण्यात आली होती. संस्था राबवित आसलेल्या विविध कार्यक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.