शेलूमध्ये आई भवानी मातेच्या जत्रोत्सव

| नेरळ | प्रतिनिधी |
शेलू गावाची ग्रामदेवता असलेल्या आई भवानी मातेच्या वार्षिक जत्रा उत्सवाला 27 डिसेंबर पासून सुरुवात झाली. पाळणे- झोपले, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि खाद्य पदार्थ यांची रेलचेल असलेली ही यात्रा 3 जानेवारीपर्यंत चालणार आहे. दरवर्षी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून तेथे खेळण्याची अनेक दुकाने थाटली गेली आहेत. त्यात झोपाळे, पाळणे, अन्य खेळ यांची दुकाने लागली आहेत. मात्र त्याचवेळी यात्रेत विविध प्रकारची खाद्य पदार्थ यांची रेलचेल देखील आहे.या यात्रेची सुरुवात 27 डिसेंबर रोजी झालेली आहे.

यात्रा उत्सवाचे वतीने आयोजक समीर मसणे आणि अक्षय हिसालगे यांनी सपत्नीक पूजा केल्या नंतर यात्रेला सुरुवात झाली.यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार हे लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात त्यांचे सहकारी असलेल्या सर्व सरदार, सेनापती यांची माहितीचे प्रदर्शन स्वराज्याचे शिलेदार म्हणून मांडण्यात आले आहे. तर कर्जत तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि अन्य स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

Exit mobile version