भंडारी संस्थेच्यावतीने पूरग्रस्तांना मदत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भंडारी वाघीण स्त्रीशक्ती समिती यांच्या तर्फे खेड, रत्नागिरी,चिपळूण,महाड या ठिकाणच्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागात जाऊन एक हात मदतीचा ह्या संकल्पनेतून मदत करण्यात आली.

खारीचा वाटा म्हणून प्रत्येकी घरटी तांदूळ, गहू पिठ, कांदे, बटाटे, लसुण, डाळी, ,चहा पावडर, कोलगेट,महिलांचे कपडे, साबण, ताट,वाटी, ग्लासं इत्यादी जीवनावश्यक वस्तू सह अंगदुखी, अशक्तपणा, रक्तवाढ, प्रोटीन कॅप्सुल यांसारख्या औषधांची मदत करण्यात आली. संस्थेच्यावतीने चिपळूण मधील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली.

ह्या वेळी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दर्शन प्रकाश पारकर , उपाध्यक्ष अश्‍विन पाटील , कार्यकर्णी सदस्य सचिन कदम, विलास आंब्रे, सुहास आंब्रे रोहा तालुका प्रमुख दीप चंद्रकांत वायडेकर उपस्थित होते. ही मदत महाड, खेड, रत्नागिरी, चिपळूण ह्या तालुक्या मधील ग्रामीण दरड आणि पूरग्रस्त भागात करण्यात आली आहे.

Exit mobile version