| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अजीवन विस्तार विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि.13) जागतिक एड्स पंधरवडा निमित्त एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
रॅलीची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या मार्गदर्शनाने झाली. या रॅलीसाठी प्रमुख मार्गदर्शक अमित सोनवणे, कल्पना गाडे यांनी रॅलीमध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. पीएनपी वरिष्ठ महाविद्यालय ते गोंधळपाडा या रॅलीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एड्स बद्दल लोकांच्या मनामध्ये जनजागृती केली. तसेच अलिबाग रुग्णालयातील एड्स विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुस्तिकांचे वाटप घरोघरी करण्यात आले. रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमकार पोटे, संचालक विक्रांत वार्डे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. कैलास सिंह राजपूत, प्रा. संपदा शिंदे, अजीवन विस्तार विभागाच्या प्रा. वृषाली घरत, इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पी.एन.पी महाविद्यालयाकडून एड्स जनजागृती रॅली
