वायुसेनेच्या विमानाचा अपघात; दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू

| तेलंगणा | वृत्तसंस्था |
भारतीय वायुसेनेच्या शिकाऊ विमानाचा तेलंगणामध्ये अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी विमानात एक ट्रेनर पायलट आणि एक ट्रेनी पायलट होते. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादमध्ये सोमवारी (दि.4) ही घटना घडली. खुद्द हवाई दलाने ही माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 8.55 वाजता तेलंगणातील दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीमध्ये पिलाटस प्रशिक्षण विमानाला अपघात झाला. या विमान अपघातात हवाई दलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.

Exit mobile version