| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एअर इंडियाच्या रविवारी सकाळी दिल्लीहून इंदूरला निघालेल्या विमानाला टेकऑफ करतानाच आग लागली. विमानाच्या उजव्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पायलटने वेळ न घालता याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आणि तात्काळ लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर लगेचच विमानाची लँडिंग दिल्ली विमानतळावर करण्यात आली. एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक 2913 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे येतंय. इंदूरला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट 2913 ला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षित विमानाच्या बाहेर काढण्यात आले.पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ होता होता वाचला असून, सर्व प्रवासी सुखरुप आहेत.






