दोनशेहून अधिक तालिबान दहशतवादी ठार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात 200 पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाले आहेत. वायू सेनेने शेबर्गन शहरात तालिबान्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करीत हा एअर स्ट्राईक केला, अशी माहिती अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, वायु सेनेकडून रविवारी त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात 200 पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्या संख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची 100 पेक्षा अधिक वाहने नष्ट झाली.
जावजान प्रांताच्या शेबर्गन शहरातील तालिबानच्या जमावाला बी-52 बॉम्बरने निशाणा बनवलं गेलं, अशी माहितीदेखील काल अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकार्याने ट्विटद्वारे दिली होती.