क्रिकेट स्पर्धेत ए.जे स्पोर्ट्स विजयी ; प्रणित उलवेकरचे दमदार शतक

। पोयनाड । वार्ताहर ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लिग स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना रविवारी झुंझार युवक मंडळ पोयनाडचा मैदानावर ए.जे क्रिकेट स्पोर्ट्स अससोसिएशन कळंबोली विरुद्ध पँथर क्रिकेट स्पोर्ट्स पनवेल या दोन संघामध्ये झाला. त्यामध्ये ए.जे स्पोर्ट्स संघाचा मधल्याफळीतील फलंदाज प्रणित उलवेकर यांनी स्पर्धेतील दुसरे शतक आपल्या नावावर केले. 106 चेंडूनत 22 चौकरांच्या साहाय्याने प्राणितने 136 धावा ठोकल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ए.जे स्पोर्ट्स संघांनी 7 गडी गमावत 269 धावा धावफलकवर नोंदवल्या प्रणित उलवेकाच्या 136 तर आयुष्य महेता यांनी 66 धावा केल्या. पँथर स्पोर्ट्सकडून वेदांत बामाणकर यांनी 4 फलंदाजांना बाद केले. 270 धावांचा पाठलाग करतांना पँथर स्पोर्ट्स संघ सुरूवाती पासून लडखडला अवघ्या 75 धावसंख्येवर या संघाचे सर्व फलंदाज बाद झाले. आयुष्य महेता व श्‍लोक पाटील यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. ए.जे स्पोर्ट्स कळंबोली संघाने सामना 194 धावांनी जिंकला. प्रणित उलवेकर याला सामनावीर तर वेदांत बामांणकर याला स्टार ओपनर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अथर्व ओवे आणि अर्णव बामांणकर यांना झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, सदस्य अजय टेमकर, अ‍ॅड.गौरव लेले, अ‍ॅड.मनीष पाटील, आरडीसीए सदस्य संदिप जोशी, पराग तावडे, संदिप सवांत, अजित पाटील, जय राय, जयवंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Exit mobile version