निलेश गायकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड
गोंधळींच्या 25 वर्षाच्या मक्तेदारीला अखेर ब्रेक
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे अजय नाईक विराजमान झाले. शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला असून उपसरपंचपदी निलेश गायकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. गेल्या 25 वर्षापासून अनंत गोंधळी यांची या ग्रामपंचायतीवर मक्तेदारी होती. अखेर या मक्तेदारीला ब्रेक लागल्याने तरुणांसह, प्रकल्पग्रस्त, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
खानाव ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षापासून विरोधकांची सत्ता होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलने अखेर ही सत्ता उलथवून टाकली. खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा शुक्रवारी ( दि.17) अजय नाईक यांनी हाती घेतली. उपसरपंचपदी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निलेश गायकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य विशाखा गायकर, सज्जला शिंदे, निधी पाटील, मनीषा म्हात्रे, सुचिता म्हात्रे, युक्ता गुजर, संदेश पडवळ आदी सदस्यांसह ग्रामविकास परिवर्तन पॅनलला समर्थन देणारे ग्रामस्थ व तरुण मंडळी, महिला वर्ग उपस्थित होते.