अरे व्वा! तटकरे साहेबांवर दादांनी दिली मोठी जबाबदारी


| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकारात सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी खा.सुनिल तटकरे यांची नियुक्ती करुन शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले.

रविवारी शपथविधी झाल्यावर सोमवारपासून अजितदादा हे सक्रिय झाले.देवगिरी बंगल्यावर आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावून त्यांनी पक्ष आपल्याच बाजुने असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.याच बैठकीत खा.सुनिल तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तर विधिमंडळ प्रतोतपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केली गेली.

तटकरे यांनी आत्ताच पद स्विकारत कामाला लागावं. देवाणघेवाणची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे. प्रदेशअध्यक्ष नात्याने बाकी नियुक्त्याच अधिकार सुनिल तटकरे करु शकतील. पक्षाच्या धोरणाधिकारे आम्ही हे ठरवलं आहे.

निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे काही गोष्टी कारवाई केल्या आहेत. माझं म्हणणं एक आहे, कुठल्याही व्यक्तीची बडतर्फीची प्रक्रिया सभापतींकडे असते. त्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे गेल्यावर काही होऊ शकणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. अजित पवार यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिल पाटील कायम राहतील. पक्षाकडून कुणाचीही हकालपट्टी होऊ शकत नाही,असेही पटेल म्हणाले.

Exit mobile version