| पुणे | प्रतिनिधी |
बारामती लोकसभा निवडणुकीकडं महाराष्ट्रच लक्ष लागलंय. येथे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. बारामतीच्या या लढाईत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात संघर्ष आहे. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.
सभेत अजित पवार हे त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडं पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडं जातात. बिनविरोध मी पदे दिली. मात्र, तुम्ही त्यांचा प्रचार करत आहात. कुंकू लावायचा असेल तर एकाचेचं लावा. माझे तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा, हा काय चाटाळपणा लावलाय? असा प्रश्न अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे. यावेळी अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ घेत म्हणाले की, उद्या कदाचित ते बोलतील अजित दादा दम द्यायला लागलेत. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय. अशा स्वरूपात अप्रत्यक्षरीत्या रोहित पवार यांना त्यांनी टोला मारला. पण हे बोलताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ दिला. उपमुख्यमंत्री म्हणाले, जे वाक्य वापरलं होतं आणि त्यातून त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी माझ्या मेंदूला सातत्यानं सांगत असतो की, आपल्याला शब्द जपून वापरायचा आहे.