अजित पवारांचा अर्ज बाद

| पुणे | वृत्तसंस्था |

बारामती मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं बळ लेकीच्या पारड्यात टाकलं आहे. तर अजित पवार यांनी पत्नीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज छाननीत अजितदादांचाच अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता नणंद-भावजयांमध्ये थेट लढत होणार आहे.

Exit mobile version