पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी

चंद्रकांत पाटील यांना सोलापूर, अमरावतीचे पालकमंत्रीपद

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
सोलापूर, अमरावती- चंद्रकांत पाटील
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा- सुधीर मुनगंटीवार
Exit mobile version